नंदूरबार l प्रतिनिधी
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार अँड. के.सी.पाडवी यांचे वडील चांद्या जुगला पाडवी यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. 93 वर्षीय असलेले चांद्या पाडवी हे सातपुड्याचे कारभारी चांद्या जुगला पाडवी म्हणुन ओळखल्या जायचे. गेल्या काही दिवसांपासुन वयोमान आणि प्रदिर्घ आजाराने त्यांच्यावर नाशिक येथे वैद्यकीय उपचार सुरु होता. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
त्यांच्यावर 15 ऑगस्टला अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.मात्र यात बदल करण्यात आला असून
15 ऐवजी १६ ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजता असली ता.धडगाव येथे अंतीम संस्कार होणार आहे. त्यांना 3 मुले पाच मुली असा मोठा परिवार होता. ॲड. के.सी.पाडवी, डॉ.सिताराम चांद्या पाडवी,सुभाष चांदया पाडवी, तसेच जि.प.सदस्या ॲड.गिता चांद्या पाडवी यांच्यासह 4 बहीणी, सुन सौ.हेमलता के. पाडवी, नातु ॲड. गोवाल के. पाडवी, नात डॉ आदिमा के.पाडवी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने पाडवी परिवारावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.








