नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा बसस्थानकावर धुळे ते कालीबेल बसमध्ये महिलेची पोत तसेच एका इसमाचे रोकड असणाऱ्या पाकीट लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शहादा येथील बसस्थानकावर मंगळवारी दुपारी धुळे ते कालीबेल या बस बसमध्ये प्रवासी चढत असताना अज्ञात व्यक्ती खिसे कापून चोरी करत असल्याचे समजल्याने पोलीसांशी संपर्क करुन बोलाविण्यात आले.पोलिस तात्काळ बसस्थानकात आल्यावर चोर पळण्याच्या तयारीत असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी बसस्थानक आवारात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली . या अनुषंगाने मंगळवारी दुपारी धुळे ते कालीबेल ( बस क्रमांक एम.एच .१४ बीटी २१ ९ ४ ) या कालीबेलकडे जाण्यासाठी बसस्थानक आवारात थांबले असता प्रवासी वर्ग चढत असताना हीच संधी साधून एकजण प्रवाशांच्या खिसे कापू लागल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना माहिती दिली . यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ , पोलिस कर्मचारी मेहरसिंग वळवी , अमोल राठोड , जगदीश पाटील , राकेश मोरे , दिनकर चव्हाण हे तातडीने शहादा बस स्थानकावर पोहोचले . चोराला पोलीस आल्याचे कळताच संशयित बस स्थानकाच्या भिंतीवरून फरार होण्याचा प्रयत्न करीत असतात पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली . व त्याच्याकडून तीन पाकीट जप्त करण्यात आली . याबाबत रंजना धुडकू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयिताविरोधात शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान , संशयित खिसेकापूला अटक करण्यात आल्याने प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .