धडगांव ! प्रतिनिधी –
धडगांव तालुक्यातील उमराणी बुद्रुकचा देवपाडा येथे
बिबट्याने गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करुन पाच शेळ्या फस्त केल्याची घटना घडली . बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली असून वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावी , अशी मागणी होत आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, उमराणी बुद्रकचा देवपाडा ता. धडगांव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मुक्त संचार करीत आहेत . फोपऱ्या ठोबा पावरा यांच्या शेळ्या चरुन आल्यानंतर घरातील गोठ्यात बांधण्यात आल्या . रात्रीची संधी साधत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याने गोठ्यात प्रवेश करुन शेळ्यांवर हल्ला चढविला . या हल्ल्यात पाच शेळ्या फस्त केल्या आहेत . बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेळ्या होरफळत नेल्याने त्यांचे अवशेष काही ठिकाणी पडलेले आढळुन आले . यामुळे गावातील नागरिकांमध्ये भिती पसरली आहे . वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावे , अशी मागणी होवु लागली आहे .