नंदुरबार l प्रतिनिधी
महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू सोमवार 15 ऑगस्ट ,2022 स्वांतत्र्य दिन व मंगळवार 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतनवर्षांनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे बुधवार 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक आणि आस्थापना विषयक बाबींच्या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत. महिला लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी तक्रार अर्ज घेवून 11 वाजेपर्यंत स्वत: उपस्थित राहून सादर करावे. असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.