नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला मोटार सायकल रॅली नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीतर्फे काढण्यात आली मोटार सायकल रॅलीचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार उत्सव समितीच्या पदधिकारी यांनी अर्पण करुन मोटार सायकल रॅलीला हिरवी झेडी दाखवून नवापूर तालुक्याचे आ. शिरीषकुमार नाईक,माजी जि प अध्यक्ष भरत गावीत,उत्सव समितीचे अध्यक्ष गिरीष गावीत यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.
यावेळी आर.सी.गावीत,कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,गटनेता आशिष मावची,पं.स सभापती रतीलाल कोकणी,रोबिन नाईक,कांतीलाल गावीत,जैनु गावीत,डॉ अमित मावची,डॉ नचिकेत नाईक,फॉस्टर बालुभाई गावीत,राजुभाई गावीत,प्रेमजीत कोकणी,सरपंच ईश्वर गावीत, संजय मावची,धंनजय गावीत,कुणाल गावीत,मनोहर गावीत,तेजस वसावे,अतुल गावीत,किरण वळवी,विनेश मावची,अतुल ठिंगळे,सतिष गावीत,सुशिल गावीत तसेच बिरसा ग्रुपचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.
शहरातील महात्मा गांधी वाचनालय रोड,नारायन पुर रोड,शास्ञी नगर,जनता पार्क,मंगलदार पार्क,साईमंदीर रोड,बसस्थानक, लाईट बाजार,देवळफळी या मार्गाने फिरुन नंदुरबार जि.प च्या प्रथम महिल्या स्व हेमलताताई वळवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करुन मोटार सायकल रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,अशोक मोकळ,मनोज पाटील यांनी चोख बंदोबस ठेवला होता.तसेच दि ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिना निमित्त नवापूर तालुका आदिवासी उत्सव समिती तर्फे विविध सांस्कृतीक कार्यक्रम व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.तरी नवापूर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी मोठया संख्यने उपस्थित राहावे असे अहवान नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीतर्फे करण्यात आलेले आहे.