नंदुरबार ! प्रतिनिधी
शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
शॉपिंग मॉलमध्ये काम करणारे व्यवस्थापन व सर्व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. प्रवेशद्वारावर लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र दाखविणे आवश्यक राहील.
अठरा वर्षाच्या खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने या वयोगटातील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश करतांना वयाच पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकॉर्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.