नंदूरबार l प्रतिनिधी
अ. शि. मंडळद्वारा संचालित, आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी. बी. हुंबरे होते , कार्यक्रमाला पर्यवेक्षक के.आर. पदमर, वरिष्ठ प्राध्यापक एस. के. तडवी,श्रीमती यु. टी. पावरा उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.डी. गिरासे यांनी केले, प्रास्ताविक हेमंत चौधरी यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभाग प्रमुख श्रीमती. प्रभावती वसावे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. हुुंबरे यांनी अध्यक्षीय मनोगततून लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.आभारप्रदर्शन संगम यशोद यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू ठाकरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी नितीन मगरे, जयेश मगरे, श्रीमती ज्योती मगरे श्रीमती सुषमा टवाळे श्रीमती पूजा जैन, पितांबर वळवी, निषाद माळी यांनी परिश्रम घेतले.