नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आक्राळे येथील प्राथमिक/मध्यामिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. के. पाटील हे होते. कार्यक्रमाचे नियोजन आर. यू. पावरा व जे.टी.पाटील यांनी केले. यावेळी लोकमान्य टिळक यांच्याविषयी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सुवर्णा मॅडम, एस. एस. पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक डी.के.पाटील यांनी व्यसनापासून दुर राहण्यासाठी सर्व विद्यार्थी यांना प्रतिज्ञा देण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर यू पावरा यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.