Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवोपक्रमशील शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय : उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे

team by team
August 1, 2022
in शैक्षणिक
0
नवोपक्रमशील शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय :  उपजिल्हाधिकारी श्रीमती ठुबे

नंदुरबार  l  प्रतिनिधी

 

अध्यापन कार्यात नवनवीन संकल्पनांचा वापर करून नवोपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार उपजिल्हाधिकारी (ससप्र) श्रीमती कल्पना ठुबे यांनी काढले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व नंदुरबार जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांना पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

 

शालेय अध्ययन अध्यापन कार्यात शिक्षकांनी विविध नवीन उपक्रमांचा सहभाग करून अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरते, ही बाब लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

 

दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत अंगणवाडी सेविक/ अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यासाठी एक गट तर प्राथमिक शिक्षक/ मुख्याध्यापक यांच्यासाठी दुसरा गट व माध्यमिक शिक्षक/ मुख्याध्यापक यांच्यासाठी तिसरा गट अशा तीन गटात या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

 

जिल्हाभरातील सर्व शाळांचे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोना कालावधीमध्ये ज्या स्पर्धेचे बक्षीस वितरण झालेले नव्हते. त्यामुळे उपजिल्हाधिकारी(ससप्र) श्रीमती कल्पना ठुबे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, स्पर्धेचे जिल्हा समन्वयक पंढरीनाथ जाधव, अधिव्याख्याता डॉ. संदिप मुळे, सुभाष वसावे, विषय सहाय्यक देवेंद्र बोरसे, अनिल सोनवणे, युजवेंद्र देवरे यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य केल्यास ते नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी शिक्षकांनी नवोपक्रमाची कास धरून विद्यार्थ्यांना नवनवीन अध्ययन अनुभव दिले, तर अध्यापन कार्य प्रभावी होईल, असे मत मांडले.

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी नवोपक्रम स्पर्धेची पार्श्वभूमी स्पष्ट करून जिल्हाभरातील शिक्षकांनी नवोपक्रम स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना ठुबे यांनी उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यापूर्वी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. आपण सर्व विद्यार्थी घडविण्याचे अर्थातच देश घडवण्याचे काम करीत आहात, आपले ऋण विसरता येणे शक्य नाही, असे सांगतानाच प्रत्येक व्यक्तीने जीवनात नवनवीन उपक्रमांचा उपयोग केल्यास जीवन यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मत मांडले.

यावेळी नवोपक्रम स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी कोरोना काळात आपण राबवलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. त्यात श्रीमती कामीनी पवार, श्रीमती बबीता पाडवी, रवींद्र गुरव, रवी एकलारे, दशरथ करांडे, नितीन महाजन, चेतन पाटील यांनी आपापल्या उपक्रमांची माहिती दिली.
सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षातील नवोपक्रम स्पर्धेतील प्राथमिक शिक्षक गटातून रुपेश दिगंबर नागलगावे जिल्हा परिषद शाळा कालेखेतपाडा ता. धडगाव यांना प्रथम क्रमांक तर श्रीमती कामिनी रामदास पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 9 ता. तळोदा यांना द्वितीय क्रमांक व दशरथ रामभाऊ करांडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलवाई तालुका तळोदा यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

 

त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक गटातून रवींद्र अरुण गुरव नेमसुशील विद्यामंदिर तळोदा यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला. त्यात अंगणवाडी सेविका/ कार्यकर्ती गटातून श्रीमती बबीता रोशनराज पाडवी डोंगरपाडा (लोय) ता. नंदुरबार यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. तर प्राथमिक शिक्षक/ मुख्याध्यापक गटातून रवी रामराव एकलारे, जिल्हा परिषद शाळा धुळीपाडा ता. नवापूर यांना प्रथम क्रमांक, दशरथ रामभाऊ करांडे जिल्हा परिषद शाळा शेलवाई ता. तळोदा व श्रीमती कामिनी रामदास पवार जिल्हा परिषद शाळा नंबर 9 तळोदा या दोघांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . तर नितीन बन्सीलाल महाजन जिल्हा परिषद शाळा, दलेलपुर ता. तळोदा यांना तृतीय व श्रीमती उज्वला राजेंद्र भामरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागसरी ता नंदुरबार यांना चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक/ मुख्याध्यापक गटातून रवींद्र अरुण गुरव नेमसुशील विद्यामंदिर, तळोदा यांना प्रथम तर चेतन रमेश पाटील श्री सातपुडा वैभव विद्यालय वाण्याविहीर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन पंढरीनाथ जाधव यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जयनगर अमरधाम परिसरात स्वखर्चातून पोलवरील तार, लाईटची व्यवस्था

Next Post

आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीचा पतीने दोरीने गळफास लावून केला खून

Next Post
आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीचा पतीने दोरीने गळफास लावून केला खून

आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीचा पतीने दोरीने गळफास लावून केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add