Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनतर्फे ३१ जुलै रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी

team by team
July 30, 2022
in राज्य
0
नंदुरबार जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनतर्फे ३१ जुलै रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स संघटनेतर्फे ३१ जुलै रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी या निवड चाचणीतून नंदुरबार जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.

नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी (३१ जुलै) सकाळी आठ वाजता निवड चाचणीला सुरवात होईल. ही निवड चाचणी स्पर्धा १४, १६, १८ व २० वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात होणार आहे.
१४ वयोगटात सहभागी होणार्‍या स्पर्धकाचा जन्म हा १५ नोव्हेंबर २००८ ते १६ नोव्हेंबर २०१० या कालावधीतील असावा,

१६ वर्षांखालील गटात सहभागी होणार्या खेळाडूंचा जन्म तारीख १५ नोव्हेंबर २००६ ते १६ नोव्हेंबर २००८ या मधील असावी. १८ वयोगटात सहभागी होणार्या खेळाडूची जन्म तारीख १५ नोव्हेंबर २००४ ते १६ नोव्हेंबर २००६ या मधील असणे आवश्यक आहे. २० वर्षांखालील गटात सहभाग घेणार्या खेळाडूचा जन्म हा १५ नोव्हेंबर २००२ ते १६ नोव्हेंबर २००४ यामधील असणे गरजेचे आहे.

निवड चाचणी स्पर्धा ही धावणे, उड्या, फेकणे, रिले अशा विविध प्रकारांत घेण्यात येणार आहे. या सर्व प्रकारांत जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी ५० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले आहे.

या शिवाय ज्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड होईल अशा खेळाडूंना राज्य संघटनेच्या नियमाप्रमाणे नोंदणी व प्रवेश शुल्क भरावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा तांत्रिक प्रमुख प्रा.डॉ.मयुर ठाकरे (९७६७६७७०५६), क्रीडा शिक्षक जगदिश वंजारी (९७६३६५६६३९) तसेच चेतन शेवाळे (९८२२९३९१९७ )यांच्याशी संपर्क साधावा,

विजेत्या खेळाडूंची राज्य संघटनेच्या पात्रता निकषानुसार राज्य स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. उस्मानाबाद, अमरावती व मुंबई उपनगर येथे राज्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत निवड केलेला संघ यात सहभागी होईल, अशी माहिती सहसचिव प्रा.डॉ.मयुर ठाकरे यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी दत्तू पवार यांची नियुक्ती

Next Post

स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण खानदेश विभागिय उपाध्यक्ष म्हणून आनंदा पाटील यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add