नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर येथील फुलफळी रंगावली नदी किनारी घराची जागा दिली नाही या कारणावरुन मामा-भाच्यात वाद निर्माण होवून डोक्यावर काठीने मारुन दुखापत केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील फुलफळी नदी किनारी परिसरात सुनिल सुरेश मावची यांनी नंदऱ्या राया मावची यांना घराची जागा दिली नाही. या कारणावरुन सुनिल मावची यांना नंदऱ्या मावची याने काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली.
तसेच जिवली नंदऱ्या मावची व अनिल नंदऱ्या मावची यांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सुनिल मावची यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज परदेशी करीत आहेत.