शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या सभेत फेब्रुवारी 2022 मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेतील कला,विज्ञान, वाणिज्य व किमान कौशल्य शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखेतील अविनाश अनिल पावरा या विद्यार्थ्याला गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने त्याचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना पटेल या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.डी. सिंदखेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश,प्रा.ए.पी.पाटील,प्रा.ए.एम.पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सौ.पटेल यांनी महाविद्यालयातील शिक्षण पूरक उपक्रम एनएसएस, एनसीसी पुस्तक पिढी ही ग्रंथालय आदींच्या विषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यशस्वी नागरिक घडविण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ज्ञानदानाचे कार्य करतात विद्यार्थ्यांनी आपली आवड व कुवत ओळखून संधीचा लाभ घ्यावा व आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. प्रा.डॉ.सिंदखेडकर,प्रा. नागेश यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रा.भरत देसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. व्ही.सी.डोळे यांनी केले. आभार प्रा. शैलेंद्र पाटील यांनी मानले.उपस्थित पालकांपैकी तात्यांनी पवार यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
पालकांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयातील साधने,भौतिक सुविधा व ग्रंथालय याविषयी समाधान व्यक्त केले.शिक्षक पालक सभेचे यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.








