नंदुरबार l प्रतिनिधी
जुलै रोजी डोंबीवली येथे झालेल्या २ रे पी.सावळाराम राज्यस्तरीय साहीत्य संमेलनात नंदुरबारचे कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे लिखीत निसिधू काव्यसंग्रहाचे प्रकाशन साहीत्यीक शरद गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
निसिंधू या काव्यसंग्रहाचे लेखक व कवी संदीप पाटोळे कृषि विभागात कृषी पर्यवेक्षक पदावर कार्यरत असुन प्रामुख्याने शेती व शेतकरी यांच्याशी निगडीत शेती मातीच्या कवीता त्यांनी लिहील्या आहेत. या काव्यसंग्रहात एकुण ९२ कविता समाविष्ट आहेत.
काव्यसंग्रहाची प्रस्तावना सुप्रसिध्द जेष्ठ साहीत्यीक,८९व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनिस यांनी लिहीली आहे. तसेच काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ महाराष्ट्राचे सुप्रसिध्द चित्रकार अरविंद शेलार यांचे असुन परीस पब्लीकेशन पुणे या काव्यसंग्रहाचे प्रकाशक आहेत.
अखिल भारतीय साहीत्य परीषद-मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा आयोजित पी.सावळाराम राज्यस्तरीय साहीत्य संमेलन डोंबीवलीच्या सांस्कृतिक भुमीवर आयोजित करण्यात आले होते.या संमेलनाचे उध्दाटन सुप्रसिध्द साहीत्यीक, इतिहास संशोधक, संगीतकार, सिने दिग्दर्शक, शिव व्याख्याते, अ.भा.म.सा.प. चे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते झाले.
संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिका, नाटय दिग्दर्शिका, सुप्रसिध्द वास्तुतज्ञ, हिरकणी राजश्री बोहरा तर स्वागताध्यक्षपदी सुप्रसिध्द साहीत्यिका अनिता गुजर या होत्या. डोंबीवलीचे टी.डी.सी. बँकेचे चेअरमन, स्थानिक नगर सेवक, उदयोगपती, सुप्रसिध्द व्यक्तिमत्व बाबाजी पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.








