नंदुरबार l प्रतिनिधी
दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील
गोरजाबारी येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री व
भाजपाचे आ. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत राष्ट्रपती शपथविधीचा सोहळा साजरा करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्ग अक्कलकुवा तालुक्यातील गोरजाबारी गावात भाजपचे नेते गिरीश महाजन व नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी बांधवांनी भर पावसात आदिवासी ढोल वाजवून नृत्य सादर करत आनंद साजरा केला. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदिवासी समाजासाठी आज महत्त्वाचा दिवस असून एका सामान्य कुटुंबातील आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याने आदिवासी समाजासाठी सन्मानाचा दिवस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.