नंदूरबार l प्रतिनिधी
माजी आ.श्री.चंद्रकांत रघुवंशी यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक खात्यावर नंदुरबार बाबत त्यांनी व्यक्त भावना केल्या.
त्यात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार श्री.चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.
नंदुरबारसारख्या आदिवासीबहूल भागातील धडगाव,तळोदा, नवापूर, साक्री विभागांतील अनेक शिवसेना नगरसेवक, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, युवासेनेचे पदाधिकारी अशा अनेकांचा यात समावेश आहे. नंदुरबार येथून आलेल्या आदिवासी महिला भगिनी, स्थानिक मुस्लिम बांधवांनी देखील याप्रसंगी माझ्या सोबत असल्याचे आवर्जून सांगितले.
या मागास भागाचे मागासलेपण कायमचे दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू तसेच नंदुरबार जिल्ह्याची ओळख मुख्य प्रवाहातील जिल्ह्यांमध्ये नक्की होईल असे यासमयी उपस्थितीतांना संबोधित आश्वस्त केले.
याप्रसंगी आमदार दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार संजय राठोड, आमदार अब्दुल सत्तार, मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी सर्व नगरसेवक,
जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी, धडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष धनसिंह पावरा, उपनगराध्यक्ष राजेंद्र पावरा, नंदुरबार पंचायत समिती कमलेश पाटील, सर्व पंचायत समिती सदस्य, नवापूर, धुळे, साक्री, धडगाव, तळोदा येथील कृषी उत्पन्न समिती सदस्य, शेतकरी संघ सदस्य, शिवसैनिक, युवासैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.