नंदुरबार ! प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सिंदीदीगर गावी एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी म्हसावद पोलीसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सात दिवसांपुर्वी संशयित धनसिंग धना पावरा रा.सिंदीदीगर , ता.धडगाव याने एका महिलेचा जबरीने हात धरुन गिरणीच्या रू पाठीमागील खोलीत घेवुन जावुन फिर्यादीची अंगावरील साडी ओढण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीस मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले.दरम्यान , झालेल्या घटनेत गावातील पंचमंडळींनी पंच बसवून समझोता करण्याचा प्रयत्न केला मात्र समझोता झाला नाही . यामुळे उशिराने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात म्हसावद पोलीसात भादवि कलम ३५४ , ३५४ ( ब ) ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ठाणे अंमलदार पोहेकॉ.खंडु धनगर , पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार पुढील तपास करीत आहेत .