नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील गुजरभवाली येथून चोरट्याने ट्रॅक्टरची ट्रॉली चोरुन नेली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील गुजरभवाली येथील सखाराम देवला गावित यांच्या मालकीची ४० हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची ट्रॉली (क्र.एच.एच.१८ झेड ५२३७) चोरट्याने चोरुन नेली.
याबाबत सखाराम गावित यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास पोना.नारायण भील करीत आहेत.