Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त जनजागृती मोहिमेची समारोप

team by team
July 16, 2022
in राज्य
0
जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त जनजागृती मोहिमेची समारोप

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त नंदुरबार जिल्ह्यात जनजागृती मोहिमेची सांगता करण्यात आला.

26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येत असतो.त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 15 दिवस जनजागृती मोहिम राबवावी असे नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांना कळविले होते.

त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 1 जुलै 2022 ते दि. 15 जुलै 2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शाळा,महाविद्यालय इत्यादी ठिकाणी जनजागृती म्हणून निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,सायकल रैली, भाषण स्पर्धा,पथनाट्य इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे तरुण वयोगटातील विद्यार्थी व पालक यांचे एकत्रित चर्चासत्र/संवादसत्राचे आयोजन करण्यात आले होते,आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्याचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून दि. 15 जुलै 2022 रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त आयोजीत पंधरवाड्याची सांगता म्हणून नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे पथनाटय व सामूहिक शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री,नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील,नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकीत्सक चारुदत्त शिंदे,उप विभागीय पोलीस अधिकारी,नंदुरबार सचिन हिरे,आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान,नंदुरबार जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छीद्र कदम,नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्थेचे रवि गोसावी,युवारंग फाऊंडेशनचे जितेंद्र लुळे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर,शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.उमेश शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

यानिमीत्ताने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात युवारंग फाऊंडेशनच्या कार्यकत्यांनी व्यसनमुक्तीबाबत पथनाट्य सादर केले. सदर पथनाट्यातून व्यसनामुळे व्यक्तीचा आर्थिक -हास कसा होतो,तसेच व्यक्तीची समाजातील पत कमी होत असल्यामुळे व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.तसेच त्यानंतर शहादा येथील व्यसनमुक्त नागरीक संदीप पाटील यांनी शाळकरी वयात त्यांना लागलेल्या गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कॅन्सर होऊन स्वतःला भोगाव्या लागलेल्या त्रासाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.सदर मार्गदर्शनपर भाषणात नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याने त्याचे स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम व आजार तसेच अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे वाढत चाललेली गुन्हेगारी यांच्यातील संबंध सांगून आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहावे असे आवाहन केले.

नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात व्यसनामुळे मानवीय जीवनाच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली.तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली.

पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील पोलोस बँड पथकाने राष्ट्रगीताचे वादन करुन कार्यक्रमाची सांगता केली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली.सदर रॅलीला नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला.रॅलीचे मार्गक्रमण अंधारे चौक, जुनी नगरपालिका या मार्गाने होवून नेहरू पुतळा येथे सदर रॅलीचे समापण झाले.सदर रॅलीला नंदुरबार शहरातील डी.आर. हायस्कुल,श्रॉफ विद्यालय,पी.के.अण्णा पाटील विद्यालय, एकलव्य विद्यालय, यशवंत विद्यालय,मिशन विद्यालय,जी.टी.पी. महाविद्यालय, जिजामाता विद्यालय, भामरे कोचिंग क्लासेस मधील जवळपास 1200 ते 1300 विद्यार्थी उपस्थित होते.

सदरची रैली चालू असतांना आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून रॅलीचे मनोबल वाढवत होते. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्यानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे फेसबुक, व्हॉट्सऍप,ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमांवर “नको अंमली पदार्थाची नशा, आयुष्याची होईल • दुर्दशा ” तसेच “जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थाना नाही म्हणा” “नशे से दोस्ती जीवन से मुक्ती,नशे को दूर भगाना है खुशहाली को हमें लाना है न काम का,न काज का,नशा हे दुश्मन जान का अशा विविध पोस्ट तयार करून प्रसारीत करण्यात आल्या होत्या.

त्याचप्रमाणे अशाच आशयाचे बॅनर जिल्हयात विविध ठिकाणी लावण्यात आले होते.त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत महत्वाच्या किंवा वर्दळीच्या ठिकाणी वृद्ध तरुण यांच्या कॉर्नर बैठका घेऊन अंमली पदार्थाचे सेवन करु नये व अमली पदार्थाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात पोलिसदलाची कार्यशाळा उत्साहात

Next Post

जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण तसेच कैद्यांसाठी पाण्याचा पिंप भेट

Next Post
जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण तसेच कैद्यांसाठी पाण्याचा पिंप भेट

जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण तसेच कैद्यांसाठी पाण्याचा पिंप भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add