Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात पोलिसदलाची कार्यशाळा उत्साहात

team by team
July 16, 2022
in राज्य
0
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात पोलिसदलाची कार्यशाळा उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था,औरंगाबाद यांच्यावतीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात नंदुरबार पोलीसांना मार्गदर्शन करण्यात आले.

26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येत असतो.त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 15 दिवस जनजागृती मोहिम राबवावी असे नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांना कळविले होते.

त्याअनुषंगाने दि. 15 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथील संवाद हॉल येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्यानिमित्त “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी ” नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती शिया शेख,उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे यांनी विभागीय व्यवस्थापक अभिजीत संघई,

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे अति.जिल्हा शल्य चिकित्सक कांतराव सातपुते,नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीशचंद्र कोकणी यांचा सत्कार केला.

सदर कार्यशाळेला उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे नंदुरबार जिल्हा सल्लागार डॉ.कल्पेश चव्हाण यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा 2003 च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती शिया शेख यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याचे कलम 4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास त्याबाबत शिक्षा व कलम 6 अन्वये 18 वर्षाखालील व्यक्तिना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास व शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड
परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री व शिक्षा याबाबत तसेच सदर कायद्यांतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत देखील मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने त्याचे स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम व आजार याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर केली जाणान्या कारवाईबाबत नेमण्यात आलेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी यांची माहिती देवून कारवाई कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील,नंदुरबार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी,अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीशचंद्र कोकणी, नंदुरबार जिल्हा सल्लागार डॉ.कल्पेश चव्हाण,नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे अति. जिल्हा शल्य चिकित्सक कांतराव सातपुते,राष्ट्रीय असंसगजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. शिवाजी राठोड,उप विभागीय पोलीस अधिकारी,नंदुरबार सचिन हिरे,आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद या सेवाभावी संस्थेचे राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती झिया शेख,विभागीय व्यवस्थापक अभिजीत संघई इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे तालुका शिक्षक संपर्क मेळावा उत्साहात, शिक्षक परिषदेतर्फे आयोजन

Next Post

जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त जनजागृती मोहिमेची समारोप

Next Post
जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त जनजागृती मोहिमेची समारोप

जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त जनजागृती मोहिमेची समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add