Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे तालुका शिक्षक संपर्क मेळावा उत्साहात, शिक्षक परिषदेतर्फे आयोजन

team by team
July 15, 2022
in शैक्षणिक
0
नवापूर येथे तालुका शिक्षक संपर्क मेळावा उत्साहात, शिक्षक परिषदेतर्फे आयोजन

नवापूर l प्रतिनिधी
शिक्षक परिषदेतर्फे नवापूर येथील प्राथमिक व उच्च प्राथमिक गुजराती हायस्कूल लखाणी पार्क नवापूर येथे शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संपर्क मेळावा झाला.

मेळाव्याची सुरुवात शिक्षक परिषद गीताने संगित विशारद भानुदास रामोळे यांनी केली. बालकिसन ठोंबरे यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमपूजनाने झाले. तालुकाध्यक्ष रामू कोकणी यांनी शिक्षक संपर्क मेळाव्याचे उद्दिष्ट व तालुका शाखेने आज अखेर सोडविल्या प्रश्नाबाबत प्रास्ताविकेतून माहिती दिली.

यावेळी भविष्य निर्वाह निधी पावत्या तालुका निहाय मिळणे, आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी रक्कम खात्यात जमा होणे, व्हर्चुअल क्लासरूम साहित्य विनियोग व दुरुस्ती, एनपीएस खाते उघडणे व नियमित कपात होणे, शालेय पोषण आहाराचे प्रलंबित देयक लवकर मिळणे, सेवा पुस्तिका अपडेट करणे,

 

डीसीपीएस कपात हिशोब मिळणे, गुजराती माध्यमाच्या शिक्षकांचे विविध प्रश्न, zpfms प्रक्रिया, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित दुसरा व तिसरा हप्ता, तालुकास्तरावर प्राप्त मंजूर वैद्यकीय बिलांचे अनुदान, शाळेत उपलब्ध डिजीटल साधनांच्या देखभाल दुरुस्ती बाबत पटसंखेप्रमाणे गणवेश अनुदान न मिळणे यासह विविध प्रश्न शिक्षक बांधवांनी व्यासपीठांसमोर सादर केले.

 

या प्रश्नांना जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी शंका समाधान करून उत्तरे दिली. तालुका स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक परिषद पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन उपस्थित शिक्षकांना यावेळी दिले.

 

यावेळी जिल्हा कार्यवाह किरण घरटे, कोषाध्यक्ष शरद घुगे, कार्याध्यक्ष दिनेश मोरे, संपर्कप्रमुख जगदीश भागवत, सहसंपर्कप्रमुख संदीप काकुस्ते, कार्यकारणी सदस्य विनय नेरकर, जितेंद्र महाले, प्रसिद्धी प्रमुख मदन मुंडे, मनोज चौधरी सहसंपर्क प्रमुख संदीप खेडकर, महिला आघाडी उपाध्यक्षा सरिता काळे आदी उपस्थित होते.

 

या प्रसंगी वैदकीय बिलाबाबत विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, शिक्षक परिषदेची कार्यपद्धती आचारसंहिता व वेगळेपण याबाबत विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड, अग्रीम बाबत विभागीय सदस्य आबा बच्छाव, शिक्षक परिषदेच्या सक्षम नेतृत्वाबाबत जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव कोकणी यांनी मार्गदर्शन केले.

 

तालुक्यातील ज्येष्ठ नेते इंदास गावित यांनी तर पतसंस्थेचे संचालक राहुल साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी परिषदेने राज्यस्तरावर सोडविलेल्या कार्याची माहिती दिली. शिक्षकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करून राष्ट्रभक्ती जागृत करणे हे शिक्षक परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असून आर्थिक चारित्र्य व नैतिक चारित्र्य या मूल्यांची जपणूक करणे, चळवळीतील कार्यकर्त्यास आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.काळे यांनी केले.

 

सर्वांना सोबत घेऊन सातत्य, संपर्क व प्रवास या त्रिसूत्रीच्या आधारावर संघटन व्यापक होऊ शकते. संघटित घटकांचा उपयोग परोपकारासाठी करावा, असे आवाहन करून आगामी पदवीधर निवडणुकीसाठी शिक्षक परिषदेने नाव नोंदणी मोहीम सुरू केली असून अधिकाधिक शिक्षकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्री.काळे यांनी केले.

तालुका कार्यवाह योगेश महाले यांनी संचलन केले तर आभार महिला आघाडी प्रमुख सॅलवीना कुवर यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतितेसाठी किरण टिभे, हेमंत सुर्वे, अरविंद गावीत, वामन गावीत, दिगंबर गावीत, जयसिंग गावीत, दिनेश चव्हाण, संदिप फुंदे, प्रविण पगारे, मिलिंद जाधव, वैभव जोशी, नरेश प्रजापत, सचिन पाटील, संदिप नायका, निकुल प्रजापत, दिनेश गावीत, यशोदा गावीत, पुष्पा कापडणीस, राहुल वंजारी आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

चिनोदा येथे युवकांनी केले ४०० रोपांचे वाटप

Next Post

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात पोलिसदलाची कार्यशाळा उत्साहात

Next Post
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात पोलिसदलाची कार्यशाळा उत्साहात

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्या संदर्भात पोलिसदलाची कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add