चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील तरुण युवकांनी गुरुपौर्णिमाचे औचित्य साधत व वृक्ष लागवड अभियानात सहभागी होत तसेच पर्यावरण रक्षाणाचा संदेश देत चिनोदा येथील युवकांनी एकत्र येऊन वृक्षारोपणासाठी ४०० रोपांचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला असून यात आवळा, जांभूळ, निंब, पिंपळ, बांबू, सिताफळ आदी रोपे वाटप केले असून अजून ६०० रोपांचे वाटप करण्याचा मानस आहे.
या वृक्ष वाटपप्रसंगी चिनोदा गावातील तरूण युवक निलेश मराठे, अमृत मराठे, भगवान मराठे, प्रशांत मराठे, किरण मराठे, कैलास पाटील, भूषण मराठे, समाधान पवार, भूषण पाटील, डिगंबर मराठे, सतिश पवार आदी उपस्थित होते. यावेळी या तरुण युवकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश दिला.