Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळे येथे गुरांच्या गोठ्यात आढळला पाच फुटी कोब्रा

team by team
July 15, 2022
in कृषी
0
रजाळे येथे गुरांच्या गोठ्यात आढळला पाच फुटी कोब्रा

नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे शेतकरी छगन मराठे यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्यात पाच फुटी कोब्रा नाग आढळून आल्याने एकच धावपळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकरी शरद छगन मराठे हे नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असतांना गुरांना चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांच्या गुरांच्या गोठ्यात साठवून ठेवलेल्या चार्‍यात लपून बसलेल्या सापाचा अचानक पुस्कारा आल्याने त्यांनी हातात घेतलेला चारा खाली फेकत जीव वाचवून बाजूला झाले.

यावेळी त्यांनी मित्रांच्या मदतीने सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधून सापाविषयी माहिती दिली. दरम्यान नंदुरबार येथील सर्पमित्र प्रतिक कदम, तेजस मालचे, कुणाल भावसार, सागर साठे यांनी येवुन सापाचा शोध घेतला असता तो कोब्रा जातीचा नाग असल्याचे सांगितले.

हा इंडियन कोब्रा जातीचा नाग पाहिल्यावर भल्या-भल्यांची थरथराट होते. त्याला सर्प मित्रांनी व्यवस्थित पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडले. यावेळी गावातील बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून गावासह शिवारात अनेक मोठमोठे विषारी, बिनविषारी सर्प निघत आहेत. त्यांना पकडून हे सर्पमित्र जंगलामध्ये सोडून देत आहेत व त्यांचे प्राण वाचविता आहेत.

त्यांच्या या धाडसाबद्दल नागरिकांमध्ये कौतुक होत आहे. तसेच सर्पमित्र प्रतिक कदम, सागर साठे, कुणाल भावसार यांनी यावेळी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले की, साप दिसला की कोणीही मारू नये, आढळल्यास त्वरीत संपर्क साधावा तसेच साप पकडण्याचे प्रशिक्षण असल्यास तरच साप पकडण्याचे धाडस करावे, अपूर्ण प्रशिक्षण असल्यास जीवावरही बेतू शकते असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारचे अमर सिनेमागृह रसिकांच्या सेवेत, पुन्हा नव्या स्वरूपात सुरू

Next Post

चिनोदा येथे युवकांनी केले ४०० रोपांचे वाटप

Next Post
चिनोदा येथे युवकांनी केले ४०० रोपांचे वाटप

चिनोदा येथे युवकांनी केले ४०० रोपांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add