नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळातर्फे यंदा आषाढी एकादशीनिमित्त नंदुरबार आगारातून पंढरपूरसाठी पाठवण्यात आलेल्या बसेसद्वारे यात्रा उत्पन्नात घट आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाची पंढरपूर परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला पावली नाही.
कोरोना आणि एसटी संपाच्या खंडामुळे बंद पडलेली लालपरी नव्या जोमाने पुन्हा सुरू झाली.त्यानुसार यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त नंदुरबार आगारातर्फे पंढरपूर यात्रेसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
नियमित सेवेशिवाय यात्रेनिमित्त 64 जादा फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. 64 फेऱ्यांच्या माध्यमातून नंदुरबार ते पंढरपूर 33,248 किलोमीटर प्रवासानंतर सुमारे 9 लाख 3 हजार 360 रुपये उत्पन्न प्राप्त झाले .
अशी माहिती आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली. खानदेशातील काही शहरांमधून थेट पंढरपूरसाठी रेल्वेने विनामूल्य प्रवास यात्रेची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेक भाविकांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे यानिमित्त दिसून आले.
यामुळे नंदुरबार सह जिल्ह्यातील असंख्य भाविकांनी यंदा एसटीने प्रवास केला नाही. याशिवाय ग्रामीण भागातील एखाद्या गावाहून एकाच वेळी पन्नास प्रवासी उपलब्ध झाल्यास पंढरपूरसाठी बस सोडण्याची नियोजन होते मात्र या सुविधेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.