नंदुरबार l प्रतिनिधी
येथील राष्ट्रसंत गुरु रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजातील सेवानिवृत्त बांधवांचा सत्कार करण्यात आले. तसेच विविध पदांवर नियुक्ती झालेल्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमातून चर्मकार समाजातील सत्कारार्थी भावनिक झाले होते.
नंदुरबार शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात नंदुरबार जिल्हा रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त बांधवांचा सत्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे होते.
प्रमुख वक्ते म्हणुन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एस.रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी हे उपस्थित होते. याप्रसंगी दक्षिण भारतचे एक्झिक्युटिव्ह आय.ई.एस. अधिकारी राकेश अहिरे, बँक मॅनेजर तथा समाजसेवक माधवराव ठाकरे, पारोळ्याचे उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, शिरपूरचे नगरसेवक सुरेश अहिरे, धुळे तंटा निवारण समितीचे अध्यक्ष अशोक माथने, नवापूरच्या माजी नगरसेविका सुशिलाबाई अहिरे,
शहाद्याचे माजी नगराध्यक्ष भीमराव चव्हाण, तंटा निवारण समिती धुळेचे देविदास पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चतुर अहिरे, हिरालाल अहिरे, पितांबर चव्हाण, रामा चव्हाण, सुरेश चव्हाण, हंसराज अहिरे, आनंद चव्हाण, हेमराज अहिरे, नारायण पवार, प्रकाश जाधव, भास्कर पवार, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आर.डी.पवार, रामा चव्हाण, घनश्याम चव्हाण, आनंदा चव्हाण, जितेंद्र अहिरे, तुकाराम अहिरे, लक्ष्मण चव्हाण, चिंधु अहिरे, शंकरराव अहिरे, राकेश कंढरे, अरुण अहिरे, विजय अहिरे, मनोज समशेर, हरिष अहिरे, संजय अहिरे, मोहन अहिरे, किरण आठवले आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलसंपदा विभागात वर्ग-2 च्या अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्योत्स्ना राकेश अहिरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मगन मेहते, सेवानिवृत्त पाटबंधारेचे उपअभियंता शंकरराव फुलसिंग अहिरे, सेवानिवृत्त नायब तहसिलदार भगवान सुखदेव अहिरे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी सुरेश नारायण अहिरे, सेवानिवृत्त आयटीआयचे सुरेश नारायण पवार, सेवानिवृत्त सैन्य दलातील जवान जगन भिका अहिरे, नवापूरचे लिपीक नथ्थू बाबुलाल अहिरे यांचा सेवापूर्ती सत्कार झाला.
त्याचबरोबर नानाभाऊ अंबर अहिरे, धडगावचे नगरसेविका भावना मिनेश चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ.प्रशांत पवार यांची एम.डी शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल तर डॉ.हिमांशू राजेंद्र चव्हाण हे एम.बी.बी.एस, डॉ विवेक अहिरे हे एम.बी.बी.एस, डॉ.पुनम शंकरराव अहिरे हे एम.बी.बी.एस.,
डॉ.जगदिश नानाभाऊ अहिरे हे बी.डी.एस शिक्षणात यश मिळविल्याबद्दल गौरविण्यात आले. तसेच समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आय.ई.एस. अधिकारी राकेश अहिरे, ज्येष्ठ मार्गदर्शक दगडू अजिंठे, माजी नगरसेवक हिरालाल अहिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सत्कारार्थी मगन मेहते, परमल मनोज समशेर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गुरु रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष रमेश मलखेडे यांनी केले. कार्यक्रमात पुष्पा महेंद्र चव्हाण, भारती सुरेश चव्हाण, महेंद्र चव्हाण यांनी सत्कार्थींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गुरु रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष रमेश मलखेडे यांनी केले.
या कार्यक्रमास धुळे, पारोळा, शिरपूर, नवापूर, शहादा, नंदुरबार, विसरवाडी, चिंचपाडा, अक्कलकुवा, धडगाव, दुसाने येथील चर्मकार समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले.
आभार महेंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार दगडू अजिंठे, राजेंद्र पवार, रविदास नोकरदार समितीचे अध्यक्ष रमेश मलखेडे, उपाध्यक्ष बापू ठाकरे, सचिव विनोद अहिरे, संघटक जयेंद्र अहिरे, धनराज अहिरे, महेंद्र चव्हाण, ईश्वर सोनवणे, गंगाराम नथ्थु झांजरे, प्रदिप अहिरे, रमेश पवार, युवराज पवार, नानाभाऊ अहिरे, प्रसाद अहिरे, आनंदा अहिरे, जगन अहिरे, संतोष अहिरे, रविंद्र पवार, हर्षराज अहिरे, महेंद्र अहिरे, सुरेश नारायण अहिरे व सदस्यांनी परिश्रम घेतले.








