Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथील रंगावली नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने ४०० व्यक्तीचे स्थलांतर, १२ व १३ जुलै शाळांना सुटी जाहीर

team by team
July 11, 2022
in राज्य
0
नवापूर येथील रंगावली नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने  ४०० व्यक्तीचे स्थलांतर, १२ व १३ जुलै शाळांना सुटी जाहीर

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या १०० घरातील ४०० व्यक्तीना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत
आहे दरम्यान १२ व १३ जुलै रोजी सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले मौल्यवान सामान, महत्वाचे कागपत्रे, तसेच अन्य महत्वाचे साहित्यांसह सार्वजनिक हॉल, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.

तसेच आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

नवापूर तालुका तहसीलदार मंदार कुलकर्णी व शिक्षणाधिकारी यांनी नवापूर तालुक्यातील सर्व शाळा प्रशासन आस्थापनांना सुट्टी देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. नवापूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांचे फरशी पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी होईपर्यंत पुढील आदेशापर्यंत शाळांना सुट्टी राहणार असल्याचे सर्व केंद्रप्रमुखांना तोंडी आदेश देण्यात आले आहे.

नवापूर शहराला लागून असलेल्या रंगावली नदी काठावरील जुने महादेव मंदिर परिसर, राजीव नगर परिसर व देवळफळी परिसरातील साधारण १०० घरातील ४०० व्यक्तीना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत असल्याची माहिती नवापूर तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांनी नदी – पूर पाहण्यासाठी नदीकिनारी जाऊ नये, आपली सुरक्षितता बाळगावी असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरडी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

कात्री येथील हाडनदी व हाकऱ्या नदीला आलेल्या पूरामूळे वाहतूक ठप्प

Next Post
कात्री येथील हाडनदी व हाकऱ्या नदीला आलेल्या पूरामूळे वाहतूक ठप्प

कात्री येथील हाडनदी व हाकऱ्या नदीला आलेल्या पूरामूळे वाहतूक ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add