नंदुरबार | प्रतिनिधी
सन 2021 – 22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष डी. एल. एड. शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर जे. ओ. भटकर यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांचे www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
यासाठी दि 9 ऑगस्ट 2021 पासून www.maa.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी अंतिम मुदत 22 ऑगस्ट 2021 ही असून, डाएट स्तरावर पूर्ण भरलेल्या आवेदन पत्रांची ऑनलाइन पडताळणी दिनांक 9 ते 23 ऑगस्ट या कालावधीत केली जाणार आहे. दिनांक 26 ऑगस्ट रोजी ऑब्जेक्शन कम मेरिट लिस्ट प्रसिद्ध करणे व आक्षेप निरसन करणे, ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दिनांक 27 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी तीन वाजता पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असून, प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दिनांक 28 ऑगस्ट 2021 उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. पहिल्या फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेणेसाठी दिनांक 28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर हा कालावधी दिला जाईल. प्रथम फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी डायट कडे दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी पाठविली जाणार आहे.
दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जाण्याची मुदत 2 सप्टेंबर 2021 ही आहे. दुसऱ्या फेरीसाठी दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी प्रवेश यादी जाहीर केली जाईल. तर दुसऱ्या फेरीतील उमेदवारांना दिनांक 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2021 या कालावधीत प्रवेश घेता येतील. दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुसऱ्या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी डाएट लॉगिनवर पाठविली जाईल.
तिसऱ्या फेरीसाठी विकल्प देण्यासाठी विद्यार्थ्यांना 9 सप्टेंबर 2021 ही मुदत असेल, तर तिसरी व अंतिम फेरी यादी जाहीर करण्यासाठी 11 सप्टेंबर 2021 ही मुदत देण्यात आली आहे. तिसऱ्या प्रवेश फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्यासाठी दिनांक 11 ते 15 सप्टेंबर ही मुदत असून, तिसऱ्या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी डाएट लॉगिनवर दि. 15 सप्टेंबर 2021 रोजी पाठविण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे संबंधित अध्यापक विद्यालयांनी व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरणे दि. 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2021 . व्यवस्थापन कोट्याची प्रवेशप्रक्रिया
नियमावलीनुसार राबविण्यासाठी दिनांक 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2021 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अध्यापक विद्यालयांनी व्यवस्थापन कोटा प्रवेशाचे प्रस्ताव संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाइन सादर करण्याची मुदत दिनांक 11 सप्टेंबर 2021 ही असून, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ऑनलाइन प्राप्त प्रस्ताव तपासून त्यांचे लॉगिन मधून प्रवेश कन्फर्म करण्यासाठी दिनांक 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2021 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना संबंधित अध्यापक विद्यालयांमध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2021 पासून प्रथम वर्ष अध्यापन प्रक्रिया प्रत्यक्षपणे सुरू होणार आहे.
अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे. या शिक्षणक्रमासाठी प्रवेश अर्ज शुल्क- खुला संवर्ग रु . २०० व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग रु .१०० असे असणार आहे. ज्या उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल, तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल. प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाइन payment gateway / Ewallet स्वतःचे किंवा नातेवाईकाच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारेच स्वीकारले जाईल. या शिक्षणक्रमासाठी प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इ. १२ वी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी : support@deledadmision.in या ई – मेलवर पाठवाव्यात. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर व डॉ. वनमाला पवार यांनी कळविले आहे.