नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथील जी. टी .पाटील महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक प्रतीक माधव कदम याला नुकताच राज्य शासनाचा “उत्कृष्ट स्वयंसेवक” पुरस्कार जाहीर झाला.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय यांचे वतीने महाराष्ट्रातील विद्यापीठांकडून राष्ट्रीय सेवा योजनेत भरीव व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या रासेयो स्वयंसेवकांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते.या प्रस्तावाची राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफ़ारशीनुसार राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०२०-२१ मधे निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना, त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा शासन निर्णय क्रमांक रासेयो-२०२१/प्र. क्र.६०/६शी-७ अन्वये करण्यात आली. त्यात नंदुरबारचे गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक प्रतिक माधव कदम यास महाराष्ट्र राज्य “सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक” राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला. पुरस्काराचे वितरण मुंबई येथे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल व मंत्री, राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे.