Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, नाशिक विभागाचा दादासाहेब पोतनीस पुरस्कार नंदुरबार दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार यांना जाहीर

Mahesh Patil by Mahesh Patil
August 14, 2021
in राज्य
0
महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, नाशिक विभागाचा दादासाहेब पोतनीस पुरस्कार नंदुरबार दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार यांना जाहीर

नंदुरबार | प्रतिनिधी
पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे २०१९ वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी २०१९ साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला.तर नाशिक विभागाचा दादासाहेब पोतनीस पुरस्कार नंदुरबार दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणार्‍या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ५१ हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
पुरस्कार खालीलप्रमाणे :
वर्ष-२०१९ बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- संदीप काळे, संपादक, दै.युथ सकाळ. मुंबई.अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)  अंजया अनपरती, विशेष प्रतिनिधी, दै. टाइम्स ऑफ इंडिया. नागपूर, बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)  राजन पारकर, वार्ताहर, दै.दोपहर का सामना. मुंबई,मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)  फरहान हनीफ, उपसंपादक, दै. उर्दू न्यूज, मुंबई.यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर)  प्रवीण टाके, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर. पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)- वेदांत नेब, प्रतिनिधी, एबीपी माझा, मुंबई. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)- प्रशांत खरोटे, वरिष्ठ छायाचित्रकार, दै. लोकमत, नाशिक.केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर)-रोहीत कांबळे, छायाचित्रकार, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर. सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)- राहुल झोटे, संपादक, सिंदखेड राजा मिरर.इन (वेब), बुलढाणा. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)-प्रतिभा राजे, उपसंपादक, दै. पुढारी, सातारा. पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार- रोहिणी खाडिलकर-पोतनीस, संपादक, दै. संध्याकाळ, मुंबई. (५१ हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये १० हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- मनोज शेलार, वरिष्ठ उपसंपादक, दै. लोकमत, नंदुरबार, नाशिक.अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह)- महेश जोशी, विशेष प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, औरंगाबाद. आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग सचिन लुंगसे, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकमत, मुंबई.नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग  चैत्राली चांदोरकर, वरिष्ठ पत्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, पुणे शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग  हर्षद कशाळकर, जिल्हा प्रतिनिधी, दै. लोकसत्ता, रायगड.  ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग  एकनाथ नाईक, उपसंपादक, दै. पुढारी, कोल्हापूर. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग  जयंत सोनोने, वार्ताहर, दै. दिव्य मराठी, अमरावती. ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग  योगेश पांडे, उपमुख्य उपसंपादक-वार्ताहर, दै. लोकमत, नागपूर.
२०१९ च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत पत्रकार नरेंद्र कोठेकर, विद्याधर चिंदरकर, रेनी अब्राहम, इंद्रकुमार जैन, शेख मोहम्मद अस्लम, रश्मी पुराणिक, रवींद्र आंबेकर, अशोक पानवलकर, अरुण कुलकर्णी, संचालक (माहिती)  यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा : नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाची मागणी

Next Post

डी.एल. एड.प्रवेश प्रक्रिया सुरू इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

डी.एल. एड.प्रवेश प्रक्रिया सुरू इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयाचे एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षदिंडी

शिवदर्शन विद्यालयाचे एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षदिंडी

July 14, 2025
सैनिकी विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम

सैनिकी विद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम

July 14, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूल गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूल गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात

July 14, 2025
शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

July 13, 2025
नंदुरबार पोलिसांनी केली विविध गुन्ह्यांची उकल,5 जणांना अटक

नंदुरबार पोलिसांनी केली विविध गुन्ह्यांची उकल,5 जणांना अटक

July 13, 2025
नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

July 7, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group