Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा : नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाची मागणी

team by team
August 14, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार शहरातील मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा : नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाची मागणी
नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मोकाट, पिसाळलेले कुत्रे, डूकरांसह गुरा-ढोरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी केली आहे. तसे निवेदन नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना देण्यात आले. मागणीचा विचार न झाल्यास शहरातील सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत सोडण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदना पुढे म्हटले आहे की, नंदुरबार शहरात मोकाट व पिसाळलेले कुत्रे तसेच डूकरांची वर्दळ वाढलेली आहे. सदर मोकाट कुत्रे व डूकर ही रात्री-बेरात्री ये-जा करणार्‍या नागरिकांवर हल्ला करतात. यामुळे मोकाट कुत्रे, डूकरे, मोकाट गुरे यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. शहरातील माणिक चौक, नेहरु पुतळा, हाटदरवाजा, मुख्य बाजार, अमृत चौक, मंगळ बाजार, माळीवाडा, बागवान गल्ली, शहीद टिपु सुलतान चौक, शादुल्ला नगर, गाझी नगर, राजीव गांधी नगर, सोनाबाई नगर आदी परिसरात या मोकाट गुरेढोरांमुळे नागरीक हैराण झाले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चावामुळे बालकांचा जीव देखील गेला आहे. तसेच मोकाट गुरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवून वाहतुकही ठप्प करतात. अनेकवेळा लहान-मोठ्या स्वरुपाचे अपघात झाल्याच्या नगरपालिकेत तक्रारी केलेल्या आहेत.शहरातील विविध भागात पिसाळलेल्या कुत्रांचा व डूकरांचा फारच त्रास वाढला आहे. मोकाट कुत्रे रोज अनेकांना चावा घेतात, लोकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनात अचानकपणे घुसुन अपघात होवून अनेक अपघात झालेले आहेत. तरी आमच्या मागणीचा विचार न झाल्यास शहरातील सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत सोडण्यात येतील, असा इशाराही नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी दिला आहे. निवेदन देतेप्रसंगी आसिफ बागवान, वाजिद बागवान, डॉ.हेमंत चौधरी, पंडीत चौधरी, जाकीर शाह, रिजवान खान आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील समृद्धगाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमर्दे खुर्द गावाचा जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार

Next Post

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, नाशिक विभागाचा दादासाहेब पोतनीस पुरस्कार नंदुरबार दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार यांना जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add