नंदुरबार l प्रतिनिधी
शहरात दोन वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन निर्घुण खून केल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. निरागस बालिकेवर अत्याचार करुन खून करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
याबाबत पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात एका दोन वर्षाच्या बालिकेवर कु्ररपणे अत्याचार करुन नंतर तिच्या गळा दाबुन हत्या करण्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे. एका निरागस बालिकेवर अत्याचार होणे हा प्रकार माणुसकीला काळीमा फासवणारा आहे. अनोळखी बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करुन नंतर गळा दाबुन खून करणे हा चिडसवाणी क्रुर प्रकार समाजमनाला चटका लावणारा आहे.
पोलिसांनी त्या चारही नराधमांविरुध्द जलद गती न्यायालयात खटला दाखल करुन त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे,
नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, नंदुरबार उपतालुकाध्यक्ष विनोद वसावे, उपशहराध्यक्ष संतोष पेंढारकर, प्रविण जोशी, राम ठक्कर, प्रसिध्दीप्रमुख कल्पेश माळी, तुफान पवार, तारसिंग वळवी आदींनी निवेदनातून केली आहे.








