Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खांडबारा परिसरातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी विसरवाडी पोलीसांच्या जाळ्यात, ४ मोटारसायकली जप्त

team by team
July 8, 2022
in क्राईम
0
खांडबारा परिसरातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी विसरवाडी पोलीसांच्या जाळ्यात, ४ मोटारसायकली जप्त

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील मोटारसायकल चोरी करणारी टोळी विसरवाडी पोलीसांच्या जेरबंद केली असून त्यांच्या ताब्यातून ४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रहीवासी राजेंद्र युवराज जगताप हे त्यांचे राहते घरी झोपलेले असतांना त्यांच्या मालकीची हिरो होंडा स्पेल्डर प्रो . कंपनिची मोटारसायकल (क्र . GJ 19 S 9663) त्यांचा घराबाहेर लावलेली असतांना मध्यरात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात इसमाने ती लबाडीच्या व चोरीच्या इराद्याने चोरुन नेली .

याबाबत फिर्यादी यांनी अज्ञात इसमाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात 6 जुलै 2022 रोजी तक्रार दिली होती . खांडबारा परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांचे वाढते प्रमाण व घटनेचे गांभिर्य पाहता पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी विसरवाडी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना घटनेबाबत व चोरट्यांना पकडण्याबाबत मार्गदर्शन केले .

सदर तक्रारीच्या अनुषंगाने सपोनि नितीन पाटील , पोउपनि भुषण बैसाणे खांडबारा दुरक्षेत्र येथील पोहेकॉ सुरेश मोरे , पोकॉ प्रविण अहीरे , पोकॉ भुषण चित्ते , पोकॉ योगेश्वर मराठे , पोहकॉ मनोहर बोरसे , पोना राजु कोकणी यांनी खांडबारा गावातील व इतर इसमांना विचारपुस केली .

तसेच गोपनिय बातमीदारांकरवी माहीती काढुन संशयित आरोपी लक्ष्मण अशोक वळवी , राकेश दिलवर कोकणी , दोन्ही रा . बिज्यादेवी , ता . नवापुर यांना शिताफीने ताब्यात घेतले .

सदर आरोपीतास ताब्यात घेता पोलीस खाक्या दाखविताच संशयित आरोपीतांनी चोरलेली मोटारसायकल ही संशयित आरोपी शंकर रमेश चौधरी , रा . आश्रावा , कुकरमुंडा , जि . तापी ( गुजरात राज्य ) यास दिली असल्याबाबत सांगीतल्याने सपोनि नितीन पाटील यांनी पथक तयार करुन अक्कलकुवा मोलगी परिसरात पाठविले असता सदर संशयित
आरोपीताकडुन एकुण 4 मोटारसायकल हस्तगत करण्यात पथकास यश आले आहे .

इतर चोरी झालेल्या 3 मोटारयासकली या संशयित
आरोपीतांनी सोनगड ( गुजरात ) , करण चौफुली , नंदुरबार व रनाळे , ता.जि. नंदुरबार येथुन चोरी केल्या असल्याचे कबुल केले आहे . सदर आरोपीतांबाबत अधिकची माहीती काढली असता त्यांच्यावर राज्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याबाबत माहीती मिळाली आहे .

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन एस . पाटील , पोउपनि भुषण बैसाणे व विसरवाडी पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा नगरपालिकेची निवडणूक जाहीर, १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add