नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या गावाचा सन्मान जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम याच्या हस्ते करण्यात आला,नंदुरबार तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे गुण मिळवणाऱ्या उमर्दे खुर्द या गावातील पदाधिकारी यांनी सत्कार स्वीकारला.
यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो शाहूराज मोरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, विस्तार अधिकारी पंचायत विभाग श्री. निकुंभे यासह विजेत्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, गावकरी/जलमित्र उपस्थित होते,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव भोसले यांनी करताना वाटर कप स्पर्धेकडून समृद्ध गाव स्पर्धेचा प्रवास उलगडून सांगत, समृद्धगाव स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली,यामुळे गावाचा काय फायदा होणार आहे हे सांगितले, स्पर्धेत पुढे करावयाचे कामाची माहिती यावेळी श्री.भोसले यांनी गावकऱ्यांना दिली, मार्गदर्शन पर बोलताना शाहूराज मोरे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी यावेळी वेगवेगळ्या गावांमधून आलेल्या गावकऱ्यांसोबत रोजगार हमी योजनेची सविस्तर माहिती दिली,गावकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे त्यांनी यावेळी दिली, तहसीलदार थोरात यांनी बोलताना माझ्या विभागाकडे समृद्धगाव स्पर्धेत सहभागी गावांच्या असलेल्या कामांना तात्काळ मंजुरी दिल्या जाईल असा विश्वास गावकऱ्यांना दिला, जिल्हाधिकारी मनीषा खत्री याच्या हस्ते उपस्थित गावकऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्साह बघायला मिळाला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी बोलताना पाणी फाऊंडेशन सोबत गावकरी करीत असलेल्या कामांसाठी कौतुक केले, यापुढेही अश्याच पद्धतीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करीत या गावांचा आदर्श इतर गावेही घेतील व भविष्यात आपलेही गाव समृद्ध करण्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त केला. शेवटी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आसाने गावाने केलेल्या कामांची पाहणी करीत झालेल्या कामासाठी गावकऱ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी रोहयो शाहूंराज मोरे,तहसीलदार बाळासाहेब थोरात,स्नेहल अवसरमोल डिफओ सामाजिक वनीकरण,कृष्णा भवर,उपवनसंरक्षक, धनंजय पवार,सहायक वनसंरक्षक, एम के रघुवंशी वनक्षेत्रपाल,युवराज भाबड, भुपेश तांबोळी वनरक्षक, डीएससी चे व्यवस्थपक जितेंद्र सोनेने,सरपंच चंद्रकांत पाटील,पाणी फाऊंडेशन चे सुखदेव भोसले,निलेश पाटील, भूषण ठाकरे आदी उपस्थित होते,
या गावाचा झाला सन्मान
आसाने,जळखे, न्याहाली,बलदाने,कारली,बाह्यने,धमडाई, केसारपाडा, रनाळे खुर्द,बिलाडी, वावद ,उमरदे खुर्द या गावांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
उमर्दे खुर्द गावाला मिळाले द्वितीय क्रमांकाचे गुण
नंदुरबार तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केला असून नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द गावाला द्वितीय क्रमांकाचे १०६ गुण मिळाले.यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे, श्रावण पाटील, ग्रामसेवक भरत घूले, खंडू साळवे, रामा रावडे उपस्थित होते, गावाचा झालेल्या सत्कारामुळे अभिनंदन करण्यात येत आहे.यापुढे अधिक जोमाने गाव समृद्ध करण्यासाठी एकत्रित काम करू असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिला.