नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १२ हजाराची लाच मागून ६ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व इतर तीन इसम यांच्या विरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 160 प्रमाणे दि.11 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पोलीस हवालदार सुनील अर्जुन अहिरे, (वय 57 वर्ष) नंदुरबार तालुका पोलीस ठाणे यांनी 12 हजाराची लाचेची मागणी करून तडजोडअंती 6 हजार रुपये लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परीक्षेत्र नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे,
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार राकेश आ. चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, समाधान म. वाघ, पोह विलास पाटील, पोना अमोल मराठे, मपोना ज्योती पाटील, पोहवा विजय ठाकरे, पोना मनोज अहिरे, पोना संदीप नावाडेकर व पोना देवराम गावित यांच्या पथकाने केली आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार राकेश आ. चौधरी यांनी केले आहे.








