मुंबई l प्रतिनिधी
मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.