नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील लोणखेडा बायपास रस्त्यावरील भाऊ तात्या पेट्रोल पंपाजवळ दुचाकी घसरल्याने अचानक दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडली आहे . यात दुचाकी खाक झाली. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा-लोणखेडा बायपास रस्त्यावरील भरधाव वेगाने जात असलेली दुचाकी घसरली जाऊन यात घसरणामुळे दुचाकी अचानक पेट घेतला.यात दुचाकी जळाल्यान नुकसान झाले आहे.
ही घटना आज 21 जून रोजी घडली आहे. यावेळी दुचाकी चालकाने प्रसंगावधान साधत चालत्या दुचाकीवरून उडी घेत आपला जीव वाचविला. सदर दुचाकी ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात जावून पडली.
या दरम्यान दुचाकी चालक व इतर वाहन चालकांनी दुचाकीची आग विझविली आहे मात्र या आगीत दुचाकी खाक झाली आहे.