नंदूरबार l प्रतिनिधी
अखेर माउंट एव्हरेस्ट आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी अनिल वसावे ची निवड झाली असून अनेक समस्यांवर त्यांनी मात करत ही संधी साधली आहे.
सातपुड्यातील दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील आदिवासी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल मानसिंग वसावे यांची जगातील सर्वात उंच शिखर सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी निवड झाली असून.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची मोहिम आहे . ही मोहीम दि. 7 एप्रिल 2023 ते 7 जून 2023 दरम्यान असेल. अनिल वसावे ने आतापर्यंत अफ्रिका खंडांतील सर्वात उंच शिखर ( Kilimanjaro), युरोप खंडातिल सर्वात उंच शिखर( Mount elburs). व mount Everest base camp सर करून अशी कामगिरी करणारा पहिला आदिवासीं युवक आहे.
सोबतस तो द. अमेरीकेतील. सर्वात उंच शिखर Mount acccounga. हे शिखर सर करून लगेच ए्हरेस्टवीर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याने अनेक विश्व विक्रम आपल्या नावे केले आहे.अजून एक नवीन कामगिरी करून तो जगातील सर्वात उंच शिखर सर करून एक अभिमानाची कामगीरी करनार आहे.
अनिल ला आधी आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात आली असून आता त्याला 35 लाख एवढी मोठी रक्कम माउंट एव्हरेस्ट साठी लागणार आहे. विविध कंपनी आणि संस्था याच्या कडून तो मदतीचे आवाहन करत आहे.