बोरद l प्रतिनिधी
बोरद आऊट पोस्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या शिताफीने लाखो रुपयांचा विमल पान मसाला गुटखा जप्त केला.
बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,पपिल बाबूलाल जैन रा.म्हसावद ता.शहादा. हे आपल्या मारुती सुजूकी कंपनीच्या (एम.एच.३९ एबी.७३३७) या गाडीने म्हसावद कडे जात असतांना बोरद येथील शहादा चौफुली येथे पोलिसांना खबर मिळाल्याने त्यांना थांबविण्यात आले असता त्यांच्या गाडीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असलेला
१ लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचे ३ सफेद रंगाच्या मोठ्या गोणीत प्रत्येकी १० प्लास्टिकचे कट्टे असे एकूण ३० कट्टे,प्रत्येक कट्यात २० पान मसाला असे नाव असलेले ६०० पाऊच ज्यांची किंमत प्रत्येकी १९८ रुपये .
त्याचबरोबर १६२० रुपये किमतीचे खाकी रंगाचे मोठे पोते त्यामध्ये ३० विमल पानमसाल्याचे पाऊच त्याच्या प्रत्येक पाऊच ची किंमत ५४ रुपये या प्रमाणे.
तसेच १ लाख १२ हजार २०० रुपये किमतीच्या ३ सफेद रंगाच्या मोठ्या गोण्या त्यात प्रत्येक गोणीत ४ याप्रमाणे प्लास्टिकचे १२ कट्टे तसेच प्रत्येक कट्टयात ५० विमल पान मसाला असलेले एकूण ६०० पाऊच प्रत्येक पाऊच ची किंमत १८७ रुपये.
त्याचबरोबर १३ हजार २०० रुपये किमतीच्या निळ्या रंगाचा ३ गोण्या प्रत्येक गोणीत १० प्लास्टिकचे कट्टे असे एकूण ३० कट्टे प्रत्येक कट्टयात २० व्ही १ नाव असलेले एकूण ६०० पाऊच ,त्याच प्रत्येक पाऊच ची किंमत २२०० रुपये याप्रमाणे.
तसेच १९ हजार ८०० रुपये किमतीचे ३ सफेद रंगाच्या छोट्या गोण्या त्याच प्रत्येक गोणीत ४ प्लास्टिकचे कट्टे असे एकूण १२ कट्टे त्यात प्रत्येक कट्टयात ५० व्ही १ नावाचे तंबाखूचे प्लास्टिकचे पाऊच ६०० प्रत्येक पाऊचवर छापील किंमत ३३ रुपये याप्रमाणे मुद्देमाल जमा करण्यात आला.
याबाबत बोरद आउट पोस्टचे पोलिस नाईक विजय गोपाल विसावे यांनी तळोदा पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली असून पपिल बाबूलाल जैन यांच्या विरोधात भा.द.वी. कलम ३२८,१८८,२७३ अन्वये दाखल अमलदार राजकुमार जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्य पोलीस निरीक्षक अविनाश केदार हे पुढील तपास करीत आहेत.