नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या आठ वर्षापासून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगन्मान्य झाला आहे.मानवाच्या आयुष्यातील ताणतणाव दूर होण्यासाठी दैनंदिन योग क्रिया करणे महत्त्वाचे आहे.केवळ एक दिवस न करता वर्षाचे ३६५ दिवस योगासन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खा
डॉ.हिना गावित यांनी केले.
नंदुरबार शहरातील जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी विश्व योग दिनानिमित्त सामूहिक योगासनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वप्रथम भारत माता पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होते. रघुनाथ गावडे यांनी अनुभवातील मनोगत व्यक्त केले.
यावेळी पतंजली योग समिती, गायत्री परिवार, आर्ट आफ लिव्हिग, एन. एस. एस, एनसीसी, स्काऊट, गाईड, निरीक्षक शिक्षण विभाग ज्युनिअर कॉलेज- मुल मुली शिक्षक, जीटीपी, एकलव्य, कमला नेहरू, डी आर, यशवंत, श्रॉफ हायस्कूलमधील ३४० जण सहभागी झाले होते.
यावेळी आर.बी.पाटील, नताविस समन्वयक डॉ. एम.एस . रघुवंशी, प्राचार्य डॉ. व्ही.एस.श्रीवास्तव, प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी, एनएसएस जिल्हा समन्वयक व तालुका योग समिती प्रा.डॉ. उमेश शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.तारक दास, किर्ती राजपूत, हर्षद महाजन, क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, पतंजली योग समितीचे एन.डी.माळी, नवनीत शिंदे, वसंत पाटील,
अजय गिरासे, राम रामोळे रा. स्व.संघाचे विजय कासार, हर्षल महाजन,निखिल शर्मा, बळवंत निकुंभ, प्रकाश गवळे उपस्थीत होते.यावेळी सुत्र संचलन प्रा.डॉ.तारक दास यांनी तर योग क्रीया संचलन एन. डी .माळी यांनी केले आभारप्रदर्शन प्रा.डॉ.उमेश शिंदे यांनी केले.