नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील चिरखान येथील शासकीय आश्रमशाळेच्या आवारातून चोरट्यांनी ३२ हजार रुपये किंमतीच्या सळईच्या रिंग चोरुन नेल्या.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील चिरखान येथे मुलींची शासकीय आश्रमशाळा आहे. सदर आश्रमशाळेच्या आवारातून बांधकामासाठी असलेल्या २४ हजार रुपये किंमतीच्या ५०० किलो वजनाच्या ६ एमएमच्या लोखंडी रिंग व ८ हजार रुपये किंमतीच्या १०० किलो वजनाच्या १२ एमएमच्या लोखंडी रिंग चोरट्यांनी चोरुन नेल्या.
याबाबत देवेंद्र रमेश लोहार यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक काळूराम चौरे करीत आहेत.