नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गेंदामाळ येथे शेतातील बांध का कोरला याचा जाब विचारल्याच्या रागातून एकास काठीने डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील गेंदामाळ येथील विरसिंग जंगल्या पावरा यांनी पिचा नर्मदा पावरा यांना शेतातील बांध का कोरला असे विचारले.
याचा राग आल्याने पिचा पावरा याने विरसिंग पावरा यांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच मेरसिंग पिचा पावरा याने काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. याबाबत विरसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.काळुसिंग पाडवी करीत आहेेत.