Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात पोलिस दलातर्फे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपीला अटक

team by team
June 19, 2022
in क्राईम
0
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

नंदुरबार | प्रतिनिधी
आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पडावे यासाठी जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेतर्फे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते .दरम्यान नवापूर येथे ४ इसम जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून २० हजार २६० रुपये रोख हस्तगत करण्यात आले असुन हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हद्दपार इसमासह अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी अटक मागील काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन गटात झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभुमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पाडावेत व

जिल्ह्यातील अभिलेखावरील आरोपी यांचे हालचालींवर नियंत्रण रहावे यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने दि.१८ जून रात्री ११ ते दि.१९ जून २०२२ चे पहाटे ५ वाजे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते .

त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबविणेबाबत आदेशीत केले होते . कोंबिंग ऑपरेशन दरम्यान नवापूर पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल गार्डन येथे ४ इसम जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून २० हजार २६० रुपये रोख हस्तगत करुन त्यांच्याविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन – बेलेबल वॉरंटपैकी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे अभिलेखावरील प्रलंबीत असलेले ५ व अक्कलकुवा पोलीस ठाणे अभिलेखावरील ४ असे एकुण ९ नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली . तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले ५८ हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे .

नंदुरबार जिल्हा हद्दीतुन १ वर्षांसाठी हद्दपार केलेला महेंद्र धरम ठाकरे रा . डामरखेडा ता . शहादा हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची अथवा न्यायालयाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता शहादा येथे मिळून आल्याने त्याच्याविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेचे अमंलदार यांनी केलेली असुन पुढील काळात देखील कोंबिंग ऑपरेशन योजना संपुर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

पेरणीच्या तोंडावर वीज पडल्याने बैलाचा मृत्यू

Next Post

नॅशनल हायवेच्या कामातील मातीचे ढिगारे रंगावली नदी पात्रात, पुर आल्यास नवापूर शहरात घुसण्याचा धोका

Next Post
नॅशनल हायवेच्या कामातील मातीचे ढिगारे रंगावली नदी पात्रात, पुर आल्यास नवापूर शहरात घुसण्याचा धोका

नॅशनल हायवेच्या कामातील मातीचे ढिगारे रंगावली नदी पात्रात, पुर आल्यास नवापूर शहरात घुसण्याचा धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add