नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात निर्धारीत वेळेपेक्षा अधिक आस्थापना चालू ठेवणार्या व तेथे उपस्थीत असलेल्या १६ जणांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील व्ही.टी.पॅलेस हॉटेल येथे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून निर्धारीत वेळेपेक्षा जास्तवेळ हॉटेल सुरू ठेवण्यात आली होती.यावेळी त्या ठिकाणी पार्टी करत कुठल्याही प्रकारचा मास्क न लावता एकत्र आढळून आले म्हणून असई शिवाजी काटकर यांच्या फिर्यादीवरून अमोल मधुकर चौधरी, राम लालचंद मुलानी, पंकज कन्हैयालाल तेजवाणी, सिध्दार्थ महेशलाल शर्मा, राहुल टिकमदास शर्मा, हितेश अनिलकुमार जामनानी, अंदरलाल हसाणी, राहुल राजकुमार चावला, जयेश नामदेव कुकरेजा, लखन शामलाल कटारी, राहुल सुभाष खानवाणी, हर्ष मनोजकुमार नानकानी, राहुल श्यामकुमार नानकानी, निखील सेवकराम कुकरेजा, राहुल हाजीरीमल वर्मा, नितीन प्रकाश सुरवारे (सर्व रा.नंदुरबार) यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम २३८, २६९, २९० सह साथरोग प्रतिबंध कायदा कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना प्रेमचंद जाधव करीत आहेत.