नंदुरबार ! प्रतिनिधी
तालुक्यातील रजाळे येथे ग्रामपंचायतीच्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुली विभागातून पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांना मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती किशोर पाटील उपस्थित होते. यादरम्यान 18 दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या वसुली विभागातून पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. यात राजू भिल, कोमलसिंग गिरासे, शेवंताबाई पांगारे, जितेंद्र गिरासे, कैलास पानपाटील, कविता यशवंत इंदवे, सागर यशवंत इंदवे,राहुल गिरासे, सुभाष मोहिते, देविदास मराठे, साहेबराव पाटील, हेमराज पाटील, अंबालाल मराठे, राजेंद्र गिरासे, शेवंताबाई जाधव,सुरतसिंग गिरासे, पोपट मिस्तरी, आना मोहिते या दिव्यांग बांधवांना धनादेशद्वारे रक्कम देण्यात आली आहे. याप्रसंगी सरपंच रेखाबाई पाटील, उपसरपंच मनोज पाटील, ग्रा.पं सदस्य भटू मराठे, भावराव मराठे, गुलाब भिल, राजकोरबाई गिरासे, सोनाली पाटील, विद्या पानपाटील, अलका भिल, इंदुबाई वाघ, पोलीस पाटील वंदना पाटील, ग्रामसेवक चंद्रसिंग ठाकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.