नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये भाईचारा निर्माण व्हावा व सर्वत्र शांतता सामाजिक सौदार्ह्यचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन करीत हजयात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला.
नंदुरबार येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळच्या वतीने हज यात्रेकरूंचा सत्कार शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, नगरसेवक फारूक मेमन, रियाज कुरेशी, पेश इमाम जामा मशिदीचे हाफिज अब्दुल्ला,मौलवी युसूफ, हाजी जकाउल्लाह इनामदार, अमीन अन्सारी, अबुलहसनात सैय्यद, माजी मुख्याध्यापक नजमुद्दिन शेख आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, हजयात्रेकरूंनी हिंदू मुस्लिम व सर्व धर्मीयांमध्ये एकोपा निर्माण व्हावा.सर्वत्र सामाजिक सलोखा शांतता नांदावी यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे करावी.
जिल्ह्यातील ५९ यात्रेकरूंचे लसीकरण जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केले. लसीकरणासाठी परिचारिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील मुस्लीम बांधव उपस्थित होते.