Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे भाजपातर्फे वीज वितरणवर मोर्चा

team by team
June 11, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे भाजपातर्फे वीज वितरणवर मोर्चा

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहर तसेच ग्रामीण भागातील विजेच्या समस्या, शेती पंपाचे नवीन विज कनेक्शन तसेच घरघुती मिटरचे रिडींग न घेता अंदाजित विज देयक
दिले जात असल्या बाबत नवापूर भाजपातर्फे वीज वितरणवर मोर्चा काढून विज अभियंता हेमंत बनसोड यांना निवेदन देण्यात आले.

त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की नवापूर तालुका हा आदिवासी उपयोजना क्षेत्रात येत असुन जवळपास ८० टक्के आदिवासी शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबुन आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना बागायत शेती करतांना मोठया प्रमाणात विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक वेळेस शेतीपंपांचे मिटरचे रिडींग न घेता अंदाजितपणे विजेचे अवाजवी देयेक दिले जाते, मुदतीनंतर विज देयक दिल्याने अतिरीत शुल्क आकारणी केली जाते,

नवीन शेती पंपाचे विज कनेक्शन वेळेवर दिले जात नाहीत, विद्युत रोहीत्र नादुरुस्त झाल्यास वेळेवर उपलब्ध केला जात नाहीत, विद्युत रोहीत्रवर अतिरीक्त कनेक्शन दिल्याने विजेचा योग्य असा भार शेती पंपास न मिळाल्याने शेतकऱ्यांचे देखील शेती पंप नादुरुस्त होतात त्यामुळे त्यांच्या बागायत पिकांचे अतोनात नुकसान होते .

तसेच शेतीपंपासाठी दिवसाला ८ तास विज पुरवठा करता त्यात देखील कधी तार तुटली, वरुन सप्लाय बंद आहे· लोडशेडींग आहे हे काम ते काम अशा रितीने १ ते २ तास वाया घालवितात, दुसरे असे की ३/४ महिने पाऊस पडतो त्यात विजेचा वापर कमी प्रमाणात होतो, तांत्रिक कारणामुळे २/३ दिवस विज सप्लाय बंद होतो तरी देखील शेतकऱ्याला दर ३ महिन्याचे पुर्ण विज देयक देतात, वापर असो-नसो शेतकऱ्यांना विज देयक पुर्ण अदा करावेच लागते.

सन-२०१९ आर्थिक वर्षात HVDS योजना राबविली गेली त्या योजनेचा ठेका अग्रवाल पॉवर यांना देण्यात आला शेतकऱ्यांना स्वतंत्र १० KVA चे विद्युत रोहीत्र दिले गेलेत ते अतिशय चालु कंपनीचे असल्याने कार्यान्वीत करुन तीन महिन्याच्या आतच फेल झालेत.

शहरी भागातील घरघुती मिटरचे रिडींग न घेता अंदाजितपणे विजेचे अवाजवी देयेक दिले जाते
वास्तविक रिडींग घेऊनच विज देयके दिले गेले पाहिजे, मुदतीनंतर विज देयक दिल्याने अतिरीत शुल्क आकारणी केली जाते, विज देयक भरणा केल्यानंतर देखील पुढील विज देयकात अतिरीक्त विज शुल्क समावेश करुन विज देयक दिले जाते,

जे ग्राहक नियमीत विज देयक भरतात त्यांना देखील व्याज लागुन येते हे कस काय ? श्रमजिवी कामगार दिवसभर बाहेर मजुरी करीत असतात ते दिवसभर घरी राहात नाही त्यांचे विज देयक देखील रु.१० हजार ते रु. ८० हजार पर्यंत अंदाजितपणे दिले जातात ?

सदरची बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असुन शेतकऱ्यांचे तसेच शहरी नागरीकांच्या विजेच्या समस्यांकडे तातडीने व जातीने लक्ष देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे.असे निवेदना मध्ये म्हटले आहे.

निवेदनावर भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,तालुका अध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,तालुका चिटणीस हेमंत जाधव,जैनु गावीत,जमील पठाण,दिनेश चौधरी,संदिप गावीत,रवि गावीत,अय्युब गावीत सह शेतकरी व भाजपचे पदधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक मनोज पाटील पोहेका कैलास तावडे,पवन राजपूत,निजाम पाडवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

ना ना करीत अखेर: १३ जून पासून सुरत- भुसावळ एक्सप्रेस धावणार, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

Next Post

सोडून गेलेल्यांचे नुकसान तर एकनिष्ठांना मिळाला न्याय : जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

Next Post
सोडून गेलेल्यांचे नुकसान तर एकनिष्ठांना मिळाला न्याय : जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

सोडून गेलेल्यांचे नुकसान तर एकनिष्ठांना मिळाला न्याय : जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add