नंदुरबार l प्रतिनिधी
महान क्रांतिकारी व आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जिल्हाभरात त्यानां अभिवादन करण्यात आले ,
भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे देखील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतीय किसान सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पंडीत तडवी व किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी , भिलिस्थान लायन सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकित वळवी ,भटके विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव,नवापूर तालुकाध्यक्ष सुनिल गावित रिवदास वळवी, शहराध्यक्ष राजेश माळी,जगन वसावे,सुधाकर वसावे ,श्रीराम वळवी,भरत वळवी ,राजेश वळवी,भास्कर तडवी,सावन पवार आदी उपस्थित होते.