Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विखरण येथे शेतीसाठी बी-बियाणे घेण्याकरीता जपून ठेवलेले १ लाख ३५ हजार चोरट्यांनी केले लंपास

team by team
June 9, 2022
in क्राईम
0
विखरण येथे शेतीसाठी बी-बियाणे घेण्याकरीता जपून ठेवलेले १ लाख ३५ हजार चोरट्यांनी केले लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील विखरण गावात एकाच रात्रीतून चोरट्यांनी दोन घरे फोडून १ लाख ३५ हजार रुपये रोख व साडे ११ ग्रॅम वजनच्या सोन्याच्या ३ अंगठ्या आणि १० भार चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळविला असून शेतकऱ्यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

चोरीची माहिती कळताच नंदुरबार तालुका पोलिसांनी घटनास्थळी येऊन श्वान पथकासह पाहणी केली असून मात्र चोरट्यांचा माघ दूरपर्यंत दिसून आला नाही. खरिप हंगाम जवळ आला असून शेतीसाठी बी-बियाणे घेण्याकरीता जपून ठेवलेले पैसेच चोरट्यांनी चोरून नेले आहे यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्रीच्या सुमारास विखरण गावात अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून मुद्देमाल लंपास केला आहे. यात वृद्ध शेतकरी आत्माराम धाकु पाटील हे आपल्या परिवारासह घराच्या छतावर झोपले असताना चोरट्यांनी याची संधी साधत घराच्या पुढील दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

यात लोखंडी पेटीत ठेवलेले १ लाख ३० हजार रुपयांची रोकड व एक ५ ग्रॅमची अंगठी , ६ ग्रॅम, एक अर्धा ग्रॅम अशा तीन सोन्याच्या अंगठ्या आणि १० भार चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला आहे.तसेच चोरटे एवढ्यावरच न थांबता दुसरे घर टार्गेट करून विखरण येथील शेतकरी चंद्रभान विनायक पाटील यांच्याही घराच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली पाच हजारांची रोकड व चांदी चोरून नेली.

गावात दोन ठिकाणी चोरी झाल्याची माहिती सकाळच्या सुमारास उघडकीस आली असता गावकर्‍यांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली आहे.चोरी झाल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलिसांना कळविण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे .

याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरील दोन्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यावेळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार पोलीस पाटील दीपमाला पाटील व पोलिस पथक उपस्थित होते. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त किसान सेनेतर्फे अभिवादन

Next Post

कळंबू येथील घरफोडी प्रकरणी पोलिसात एक लाख लंपासची नोंद, मात्र शेतकरी म्हणतो साडे पाच लाख रोख व २५ तोळे सोने गेले चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add