Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित : खा.डॉ.हीना गावित

team by team
June 9, 2022
in राजकीय
0
भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित : खा.डॉ.हीना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
भाजपाची केंद्र सरकारमधील आठ वर्ष पूर्ण झाले असून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणसाठी समर्पित करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील आठ तालुक्यात गेल्या आठ वर्षात शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली.

भाजपाने केंद्रामधील आठ वर्ष पूर्ण केली असून याबाबत माहिती देण्यासाठी खा.डॉ.हीना गावित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, गेल्या आठ वर्षात नंदुरबार जिल्ह्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झाली आहे. खान्देश एक्स्प्रेस सुरु करण्याचे स्वप्न साकार झाले आहे. यापुढे पुण्यासाठीही एक्स्प्रेस सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून १२ लाख लाभार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेतून शहरी भागासाठी २ हजार ३६१ तर ग्रामीण भागासाठी ९६ हजार ७४३ घरांना मंजूरी देण्यात आली आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २ लाख ७१ हजार ८४५ स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. हर घर नल से योजनेंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून २०२३ पर्यंत १ लाख ४८ हजार ८७२ तर २०५३ पर्यंत २ लाख ४९ हजार ४३६ घरांना नळ जोडणी करण्यात येणार आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजनेतून २ हजार ७७२ फेरीवाल्यांना ३.५५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३४ हजार ८९२ आयुष्यमान भारत कार्डचे लाभार्थी असून यातील २ लाख २९ हजार ५१९ कार्ड वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात ११ लाख २० हजार १९७ जणांना पहिला डोस तर ७ लाख ६१ हजार ८८५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ११५ लाभार्थ्यांना ७८ कोटीहून अधिकची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

पंतप्रधान पिक विमा योजनेतून ३ कोटी ७४ हजारांची भरपाई देण्यात आली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेतून देशात सर्वाधिक गॅस जोडणी देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून ५ लाख ७८ हजा ८३६ महिलांचे बॅक खाते उघडण्यात आल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली. यासह विविध योजनांचा आकडेवारीसह आढावा सादर केला. यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : ९ जून राशिभविष्य

Next Post

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त

Next Post
प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त

प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटनेची नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add