नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे स्थानिक गुन्हे शाखेची अवैध सुगंधीत तंबाखु विक्रेत्यावर कारवाई , 6 लाख 42 हजार रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखुसह संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना दि. 6 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,
नंदुरबार शहरात पटेलवाडी भागात एका इसमाने अवैधरीत्या महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखुचा मोठ्या प्रमाणात साठा केला असून तो त्याची विक्री करणार आहे . अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याबाबत आदेशीत केले .
मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन अत्यंत गोपनीयरित्या नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथे सापळा रचला .
पटेलवाडी येथील मशिद ए उमरच्या समोरील एका घरात सुगंधीत तंबाखु ठेवल्याची माहिती गोपनीय बातमीदार याने दिल्याने पोलीसांनी त्या घरावर छापा टाकला . सदर घरामध्ये एक इसम होता पोलीसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला
पोलीसांनी अब्दुल हमीद शेख रा . पटेलवाडी , नंदुरबार यास शिताफीने ताब्यात घेतले . सदर इसमाच्या घराची पाहणी केली असता एका कोपऱ्यात झाकून ठेवलेल्या पांढऱ्या व पिवळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या आढळून आल्या त्या गोण्यांमधुन उग्र वास येत होता .
संशयीत इसम अब्दुल शेख यास उग्र वास येणाऱ्या गोण्यांबाबत विचारणा केली असता तो सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देवु लागला . त्यामुळे पोलीसांनी उग्र वास येत असलेल्या गोण्या पंचासमक्ष उघडून पाहिले असता त्यामध्ये विविध कंपनीच्या सुगंधीत तंबाखुची 9 हजर 327 पाकीटे किमंत रुपये 6 लाख 42 हजार 300 असा मुद्देमाल मिळुन आला .
अब्दुल हमीद शेख रा . पटेलवाडी , नंदुरबार व वर नमुदचा सर्व मुद्देमाल हा ताब्यात घेऊन नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भा.द.वि. कलम 328,188,272,273 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तसेच आरोपी यास अटक करण्यात आली असून सदरची सुगंधीत तंबाखु कोठुन आणली ? याबाबत विचारण केली असता तो काहीही सांगण्यास तयार नव्हता . सदर गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी असून त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार राकेश वसावे , जितेंद्र तांबोळी , पोलीस शिपाई अभिमन्यु गावीत , दिपक न्हावी , अभय राजपुत यांनी केली आहे .