Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चौथ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी ३१जुलै पर्यंत हर घर दस्तक’ अभियानातंर्गत : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
June 8, 2022
in आरोग्य
0
चौथ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी ३१जुलै पर्यंत हर घर दस्तक’ अभियानातंर्गत : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच संभाव्य चौथ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याकरिता जिल्ह्यात 1 जून ते 31 जुलै, 2022 या कालावधीत ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेला अधिक गती देऊन जुलै अखेरपर्यंत पहिला डोस राहिलेल्या नागरिकांचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.वि) कृष्णा राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याकरिता लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे.

ज्या गावात 50 टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झाले आहेत त्याठिकाणी लसीकरणास गती देवून 100 टक्के लसीकरण होईल. यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. त्यासाठी तालुकास्तरावर उद्दिष्ट देण्यात यावेत.

तालुका व गावनिहाय लसीकरणासाठी शिल्लक लाभार्थ्यांची माहिती घ्यावी. लवकरच शाळा सुरु होत असल्याने 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण करावे. त्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे. हर घर दस्तक मोहिमेतंर्गत विशेष शिबिर आयोजनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

लसीचा पहिला डोस घेणे प्रलंबित असलेल्या 4 लाख 56 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. दुसरी मात्रा घेणे प्रलंबित असलेल्या 8 लाख 16 हजार लाभार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे.

त्यासाठी लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या यादीनुसार घरोघरी भेट देऊन लसीकरणासाठी प्रोत्साहीत करुन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘हर घर दस्तक’ अभियानात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी यावेळी केले.

डॉ. चौधरी म्हणाले की, जिल्ह्यातील 15 लाख 75 हजार 200 लाभार्थ्यांपैकी 11 लाख 18 हजार 761 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 7 लाख 58 हजार 610 लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणासाठी

जिल्ह्यात 1 लाख 34 हजार 210 डोस उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना लसीकरण, तसेच कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्यात.

बातमी शेअर करा
Previous Post

सहा लाख ४२ हजाराच्या अवैध सुगंधीत तंबाखुसह एकास अटक

Next Post

नंदूरबार जिल्ह्यातील बारावीचा निकाल ९५.६३ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

Next Post
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा उद्या निकाल, अधिकृत संकेतस्थळे अशी

नंदूरबार जिल्ह्यातील बारावीचा निकाल ९५.६३ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add